Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

श्रीयुत गंगाधर टिपरे

कला कुठलीही असो पण तुमच्या आतला चित्रकार हा कायम जिवंत असला पाहिजे. श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका यूट्यूब वर माझ्या suggested videos मध्ये मला दिसली आणि काही भाग मी पुन्हा अनेक वर्षांनी पाहिले. ते पाहून जे वाटलं ते येथे मांडतो. सिनेमा असो वा सीरियल; सशक्त कथा किंवा लेखन असलं की ती/ते बघायला वेगळीच मजा येते. दुनियादारी, लुटेरा किंवा काकस्पर्श हे सिनेमे बघितले की हे आपल्याला लक्षात येतं. श्रीयुत गंगाधर टिपरे ही सीरियल फॉर्म मध्ये असलेल्या सशक्त कथेचं उत्तम उदाहरण आहे असं वाटतं. Episodic मालिका असूनही ती कुठेच cheap होत नाही, रटाळ होत नाही, typical ही होत नाही आणि शेवटी सकारात्मक संदेश ही देऊन जाते. समाजाचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी कुठल्याही कलाकृती नी सकारात्मक च संदेश द्यायला हवा. तो इथे अतिशय उत्तम प्रकारे दिल्या गेलेला आहे असे वाटते. ही मालिका दिलीप प्रभावळकरांच्या "अनुदिनी" या पुस्तकावरून तयार केली असल्या मुळे दैनंदिन जीवनाच्या अवतीभवतीच संपूर्ण कथा फिरते. भागाच्या सुरुवातीला भागाच्या विषयाचा अंदाज येत नाही पण साधारण १० व्या मिनिटाला अंदाज येतो आणि मग भाग पुढे ज...

लखु

पु. ल. देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधलं माझं सर्वात आवडतं व्यक्तिचित्र म्हणजे लखु रिसबूड. हा लखू कॉलेज मध्ये सभा गाजवण्यात निपुण.  वादविवादात निपुण. पण अपुऱ्या अभ्यासाचा. कुठल्याही पुस्तकाच्या चार ओळी वाचायच्या आणि त्या अशा प्रकारे मांडायच्या  की समोरचा म्हणेल की हा खूपच विद्वान आहे. पुढे कॉलेज संपतं. सर्व विद्यार्थी नोकरीला लागतात आणि लखुसुद्धा एका नियतकालिकात/वृत्तपत्रात लागतो. तिथेही सुरुवातीच्या दिवसात चित्रपट समिक्षांचे फर्डे लेख लिहून हा लखु नाव कमावतो. पण पुढे कुठल्याच गोष्टीचा नीट अभ्यास नसल्यामुळे त्याचा प्रभाव हळू हळू प्रभाव ओसरू लागतो. आयुष्यात फारशी प्रगती होत नाही. पुढे अनेक वर्षे त्या नियतकालिकात काम केल्यावर लखु संपादक/उपसंपादक झालेला असतो. पण फारसा आनंदी नसतो. नियतकालिक पण फारसे चालत नसते. मग एक दिवस मासिकाचे मालक/संपादक लखुला राशिभविष्य लिहा म्हणून सांगतात.  लखुची तत्वं लगेच आडवी येतात. येवढे मोठे मोठे लेख लिहिलेला मी राशिभविष्य का लिहू असा विचार त्याच्या मनात येतो. तो राशिभविष्य लिहायला नापसंती दर्शवतो. तेवढ्यात मालक म्हणतो, "रिसबूड राशिभविष्...

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला - एक interpretation

काही दिवसापूर्वी मी माझी गाडी एका दुकानासमोर लावत होतो. तेव्हा तिथल्या दुकानदारानी मला स्मितहास्य करत सांगितले की , "भैया, प्लीज यहाँ पर गाडी मत लगाओ।". मी "ठीक है" म्हणत लगेच गाडी दुसरीकडे लावली. आता हेच त्यानी मला उडवाउडवीच्या थाटात सांगितले असतं तर मी पण म्हंटलं असतं की, आता तर मी इथेच गाडी लावतो; आणि मग संघर्ष उभा राहिला असता. त्या दुकानदारानी काय केलं? तर, आपलं इप्सित साध्य करण्याकरता माझा ego जपला. तो त्याच्यापरी बरोबरच होता पण त्यानी ती गोष्ट कशा प्रकारे सांगितली या गोष्टीला महत्त्व आहे. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देताना सांगितले जाते की, The pitch and the tone of the voice matters most in an effective communication. कदाचित भारतीय परंपरेमध्ये effective communication चा धडा देण्यासाठीच "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणण्याचे प्रयोजन असेल काय? मोठ- मोठ्या संघटना या यशस्वी होण्या मागे त्यांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्याची हातोटी कारणीभूत आहे. "तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मी आता जे सांगितलं तसा तू विचार करून पहा"...

एक सांगीतिक अनुभव

दि. ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०१६ दरम्यान झालेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती आंतरराष्ट्रीय संगीत समारोहाचा अनुभव सांगतो. वर्तमानपत्रात समारोहाची जाहिरात वाचली; तेव्हा कळलं की समारोहात पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान, शिवमणी, प्रवीण घोडखिंडी, रशीद खान, पं. व्यंकटेश कुमार, राहुल देशपांडे हे सर्व दिग्गज आपली कला सादर करणार आहेत. एवढे दिग्गज (नागपुरी भाषेत "तोफचंद") एकाच महोत्सवात येत असल्यावर कोणी रसिक अशी संधी सोडेल?. अर्थातच नाही. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर दीपमाळ, व्हरांड्यात भीमसेनजी आणि मास्टर दीनानाथांच्या सुंदर रांगोळ्या, फुलांनी शृंगारलेला रंगमंच, त्या फुलांचा संपूर्ण सभागृहभर दरवळत असलेला सुगंध, त्याच्या जोडीला या सर्व दिग्गजांनी आळवलेला एक एक स्वर आणि त्याच्यावर आपले प्राण कानाशी एकवटून एक एक स्वर साठवणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी म्हटलेले वाह!!!! हे सारे आजही आठवले तरी मला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो;असं वाटतं की त्याच्यातच तरंगत राहावं. ताकाहीरो अराई नावाच्या एका संतूर वादकानी तर इतकी सुंदर संतूर वाजवली की त्याचं संतूरवादन संपल्याच्या दोन तासानंतरही मी...

पुण्यस्मरण बाळासाहेब देवरसांचे

आज दिनांक १७ जून. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी. संघ स्वयंसेवक म्हणून बाळासाहेब सर्वच कार्यकर्त्यांसाठी एक अभ्यासाचा विषय होऊ शकतात. बाळासाहेबांचं १९६३ पर्यंतचं कार्यक्षेत्र हे नागपूरच. वास्तविक ते १९३९ पासून प्रचारक, परंतु बंगालमध्ये काही महिन्यांचा प्रचारकाळ सोडला तर सहसरकार्यवाह होई पर्यंत त्यांची पूर्ण ह्यात ही नागपुरातच गेली. बाळासाहेबांना गुरुजी डॉक्टर हेडगेवारांची प्रतिकृती आहेत असं म्हणत. ही  केवळ गुरुजींची उक्ती नव्हती; बाळासाहेबांची अनेक भाषणं आणि त्यांचं आयुष्य आपण नीट बघितलं तर, डॉक्टरांच्या अनेक भुमिकांशी आपल्याला साधर्म्य सापडेल. १९४६ सालच्या नागपुरातल्या बौद्धिक वर्गात बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले, की आम्हाला केवळ दक्ष आरम करत बसायचं नाही, तर समाजजीवनातल्या सर्व क्षेत्रात लवकरात लवकर सुयोग्य कार्यकर्ते पाठवायचे आहेत. अन्य क्षेत्रात जो कार्यकर्ता काम करायला चालला आहे त्यानी कसं काम करावं या बाबतीत बाळासाहेबांनी केलेलं मार्गदर्शन अतिशय अमोल आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी संघर्षानी नव्हे तर ...

शिवछत्रपती आणि 'ती' मंतरलेली सात वर्षे

आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य अतिशय नाट्यपूर्ण आहे. अफझलखानाचा शिताफीनी केलेला वध, त्यानंतर लगेचच झेललेलं सिद्धी जौहरचं आक्रमण, आणि पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे कूच, चालून आलेला शास्ताखान आणि लाल महालात घुसून त्याची तोडलेली बोटे आणि त्यानंतर आग्रा भेट आणि तेथून मिठाईच्या पेटाऱ्यातून केलेलं पलायन, या त्या नाट्यपूर्ण घटना होत. या सर्व घटना केवळ सात वर्षांच्या कालावधीतल्या आहेत (१६५९ ते १६६६). पण या घटना महाराजांच्या आयुष्याची ओळख मानल्या जातात. या सर्व घटना आपल्याला माहिती आहेत, पण आपण या घटनांकडे मानसिकदृष्ट्या(psychologically) पाहिलं पाहिजे. ही सगळी संकटं भयंकर म्हणजे भयंकरच मोठी होती. संकटांचा डोंगर म्हणजे काय तर या सर्व घटना. तरीदेखील शिवाजी महाराजांनी या संकटांचा केलेला सामना अक्षरशः अद्वितीय आहे. आपले प्राण घ्यायला तो धिप्पाड ७ फूट उंच, क्रूर अफझलखान येतो आहे ही कल्पनाच गर्भगळीत करून टाकणारी आहे. तरी देखील त्याला मोठ्या युक्तीनी आपल्या जवळ बोलावणं, त्याचं सैन्य आणि त्याचा अंगरक्षक त्याच्या पासून दूर करणं आणि मग त्याचं पोट फाडून त्याला संपवणं, ...