Skip to main content

Posts

Showing posts from July, 2025

नाकावरच्या रागाला औषध काय!

८० आणि ९० च्या दशकात जन्माला आलेल्या कुठल्याही मराठी मुलाला अशोक सराफ हे नाव माहिती नाही हे शक्य नाही. कारण, शनिवार – रविवारी लागणारे त्यांचे चित्रपट पहातच ही पिढी मोठी झाली आहे. महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला.  त्यांच्या अनेक भूमिकांपैकी मला अत्यंत आवडलेली भूमिका म्हणजे "कळत नकळत" या चित्रपटातला त्यांनी साकारलेला "सदा" अर्थात् "सदूमामा". हा चित्रपट स्मिता तळवलकर यांची निर्मिती होती. ही चित्रपटातली सहाय्यक भूमिका आहे. नायिकेचा भाऊ म्हणजेच नायिकेच्या मुलांचा पापड लोणची विकणारा मामा अशी ही भूमिका आहे. म्हणजेच या भूमिकेत ग्लॅमरस असं काहीही नाही. पण, तरी देखील हा चित्रपट म्हंटला की सदा आठवतो.  एखादा कुशल माणूस कसा एखाद्या कामाचं सोनं करतो हेच यातून आपल्याला दिसतं.   या सदाच्या बहिणीचा संसार मोडतो का काय अशी परिस्थिती आहे, त्याची त्याला चिंता आहे, तो संसार टिकावा अशी त्याची ईच्छा आहे पण नवरा बायकोचं भांडण असल्यामुळे त्याला काही बोलता पण येत नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळं त्यांनी ज्या प्रकारे आ...