Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

नव्या बाळाचे पाय जुन्याच पाळण्यात(?)

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 27 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सत्तास्थापनेचा निर्णय नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी घ्यावा आणि सरकार स्थापनेमध्ये आपला कुठलाच अडसर नसेल असे जाहीर केले.  भाजपाच्या नेतृत्वाला सरकार स्थापनेचे पूर्ण अधिकार आपण बहाल करीत आहोत असे चित्र त्यांनी यातून निर्माण केले.  पण, मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातले बिटवीन द लाईन्स काही वेगळेच आहेत हे जाणवत होते. नव्या सरकारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास आपण उत्सुक आहोत हे ते सुचवत होते. माझा पक्ष जरी वेगळा असला तरी मी तुमचाच माणूस आहे असा विश्वास त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाला द्यायचा प्रयत्न केला.  पण, हळूहळू या सर्व गोष्टींच्या आड वेगळेच काहीतरी आहे हे दिसायला लागले. संजय शिरसाट, हे शिंदेंचे प्रवक्ते म्हणाले की, ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील असं त्यांच्या स्वभावावरून वाटत नाही; म्हणजे द्यायचे तर मुख्यमंत्रीपदच द्या असाच सुर त्यांचा लागला. तर, दुसऱ्याच दिवशी दिल्लीला पोहोचल्यावर लगेच शिंदे माध्यमांना म्हणाले की, मुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ हे पद मला त्या पेक्षा वरच्या दर्...