चरित्रपट पाहताना एक क्षण आपल्याला असं वाटतं की, पडद्यावर तो नट नाहीच तर तो नट ज्याची भूमिका साकारतोय ती व्यक्तीच समोर आहे की काय? '83 पाहताना समोर रणवीर सिंह नाहीच तर कपिल देवच आहे असा भास अनेक वेळेस होतो. तो आनंद अत्यंत सुखावह असतो. चरित्रपट पाहताना निदान एकदातरी असा अनुभव यायला हवा. दुर्दैवाने हा चित्रपट पाहताना असं कधीच वाटलं नाही की समोर सुनील बर्वे नाही तर बाबुजीच आहेत. चित्रपटातल्या काही क्षणांचे फोटो बघितले की वाटतं पण, एरव्ही वाटत नाही. चित्रपट फ्लॅशबॅक पद्धतीत चित्रित केलाय. अशोक रानडे यांना बाबुजी मुलाखत देतायत आणि मग मागच्या काळाची दृश्ये घेतली आहेत. तसा फॉर्म घेतला नसता तर फार बरं झालं असतं असं वाटतं. चित्रपट सुरूवातीला वेग घेत नाही असं वाटतं. चित्रपटाची सुरुवात अडखळत होतेय असं वाटतं. त्यात मध्येच एका reality show मध्ये श्रीधर फडके परिक्षक आहेत आणि ते बाबुजींची माहिती सांगतात आहेत हा सीन येतो. कॅमेऱ्याला बघून थोडे nervous झालेले श्रीधर फडके आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर, डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनाची बातमी बाबुजींचे मित्र त्यांना पत्राद्वारे कळवतात आणि...