Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

पंडीत भीमसेन जोशी

शास्त्रीय संगीत म्हंटलं की तो प्रकार अनेकांना कंटाळवाणा वाटतो. पण, पहिल्या स्वरापासून आकर्षक, दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कोणाची गायकी असेल तर ती पंडीत भीमसेनजींची.  कुठलाही राग ऐकायचा म्हंटलं की ४०-५० मिनिट ऐकावं लागतं. आपल्याला इतक्या वेळ ऐकायला कंटाळा येईल म्हणून लोक शास्त्रीय गायकीकडे आकृष्ट होत नाहीत. पण, भीमसेनजींच्या गायकी चा तसा अनुभव नाही. पहिल्या स्वरापासून त्यांचं गाणं रसिकाच्या मनाचा ताबा घेतं आणि रसिक त्यांनी गायलेला प्रदीर्घ राग अतिशय सहज ऐकतो. मला वाटतं की भीमसेन जोशी या नावाची ही खरी उपलब्धी आहे. आधी अत्यंत संयमी, अत्यंत मधुर आणि मग क्रमाक्रमानी वाढत जाणारी लय आणि शेवटी द्रुत (fast) लयीतल्या दाणेदार ताना असं भीमसेनजींचं गाणं आहे.  खर्जातल्या ताना हा भीमसेनजींच्या गाण्यातल्या सोनेरी अंश आहे.  " एखादा राग ऐकावा तर तो भीमसेनचाच" अशी स्वतःची ओळख मला रसिकांमध्ये निर्माण करायची आहे असं एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते. आणि खरोखरच पुरियाधनाश्री ऐकावा तो फक्त त्यांचाच असंच वाटतं.  असं केवळ एकाच रागाचं आहे असं नाही; अनेकांचं आहे. निस्सीम गु...