Skip to main content

Posts

Showing posts from March, 2025

एक व्यक्ती, तीन विधाने आणि तीन परिणाम

जर एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीत अत्यंत शांत मनाने आणि शांत डोक्याने परिस्थितीला सामोरी जात असेल आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होत असेल तर, अशी व्यक्ती लोकांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच मला अशा व्यक्तीबद्दल लिहिण्याचा मोह देखील आवरत नाही. आज मी सर्वांना माहिती असलेल्या कथेतल्या मला जाणवलेल्या काही गोष्टी सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी नागपूरला एक नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सत्कारमूर्ती होते नागपूरचेच नेते नितीन गडकरी आणि त्यांचा सत्कार करणारे देखील नागपूरचे दुसरे नेते होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस असे म्हणाले, की गडकरी साहेब रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर मी अतिशय सांभाळून बोलतो.  आता, श्री देवेंद्र फडणवीस कसे तोलून मापून बोलतात आणि त्याचे अपेक्षित परिणाम भविष्यात कसे दिसतात याची तीन उदाहरणे मी देणार आहे. ही तीनही विधानं एक सामान्य व्यक्ती म्हणून चटकन माझ्या नजरेत भरली आणि म्हणून ती मी आपल्यासमोर ठेवत आहे.  पहिला प्रसंग आहे ते विरोधी पक्षनेता असतानाचा. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या...