महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशा मागणीच्या बातम्या सतत प्रसिद्ध होत होत्या. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवरच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री पदाबाबत मोदी आणि अमित शहा आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल हे त्यांनी जाहीर करून टाकले. गेल्या दोन वर्षांत केंद्राने जे सहकार्य केले आणि जो विश्वास दाखवला त्याचे त्यांनी आभार देखील मानले. एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरचा दावा ते सोडताहेत असे चित्र यामुळे निर्माण झाले. भाजपाच्या मतदारांच्या मध्ये यामुळे साहजिकच एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. पण, मुख्यमंत्र्यांचे शब्द आणि देहबोली पाहिली की हे लक्षात येते की ते आपला मुख्यमंत्री पदाबाबतचा दावा अधिक घट्ट करताहेत. आपला नेमका मतदार कोण, त्याचे मोदींवरचे प्रेम, आपली तळागाळातला, कष्टाळू नेता म्हणून असलेली प्रतिमा, आपल्याला जातीचं असलेलं भक्कम पाठबळ या सगळ्या ...