Skip to main content

Posts

Showing posts from May, 2025

उत्कृष्ट संवादांचे उत्कृष्ट नमुने

राॅनी स्क्रीववाला हे भारतातले एक यशस्वी उद्योजक आहेत. शिक्षणक्षेत्र, कला, दूरचित्रवाहिनी या क्षेत्रात त्यांनी अनेक यशस्वी उद्योग उभे केले आहेत. या स्क्रीववाला यांनी मध्यंतरी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव आहे "Skill it, Kill it". आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणकोणती कौशल्यॆ आवश्यक आहेत असा या पुस्तकाचा विषय आहे. या पुस्तकाचे पहिले प्रकरण "संवाद" अर्थात communication या विषयावर आहे.  प्रकरणाचे नावच "Communication is everything, Everything is communication" असे आहे. केलेले काम किंवा आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवल्या की अनेक गोष्टी सोप्या होतात असा अनुभव आपल्या सगळ्यांनाच रोजच्या जीवनात येतो.  सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीचा आणि भारत सरकारने वेळोवेळी प्रसारित केलेल्या माहितीचा या निमित्ताने धांडोळा घ्यावासा वाटतो. अर्थात्, यामध्ये घडलेल्या घटना त्यातून मिळालेला संदेश, सरकारद्वारे लिखित स्वरूपात दिली गेलेली माहिती आणि अनेक पत्रकार परिषदा यांचा समावेश आहे. पहलगाम येथील घटना घडली तेव्हा आपले पंतप्रधान हे सौदी अरेबियाच्या द...