Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

पुस्तक परिचय ४: रणांगण

  बेडेकर ..... बेडेकर काय लिहून ठेवलंत हो तुम्ही !!!! ही ... नव्हे , नव्हे हीच प्रतिक्रिया तुमची सुद्धा येईल जर तुम्ही रणांगण वाचायला घेतली तर . लेखक हा एक विचारक असतो. कथा, कादंबरी, नाटक, कविता या वेगवेगळ्या देहांचा वापर करून तो आपला विचार मांडत असतो. त्या देहांचा त्याला वापर करता येतो म्हणून तो केवळ विचारवंत न राहता कलावंत होतो. रणांगण ही कादंबरी  म्हणजे मराठीतला मैलाचा दगड.  ऑगस्ट आणि सप्टेंबर १९३९ या काळात म्हणजेच दुसरे महायुद्ध उंबरठ्यावर असताना ही त्याच विषयाचा आधार घेऊन लिहिलेली कादंबरी . त्याच्यामुळे ही समयोचित कलाकृती आहे . ज्या घटना आज आपल्याला ऐतिहासिक वाटतात त्या काळाचा लेखक स्वतःच साक्षीदार असल्यामुळे त्या घटनांचा उपयोग लेखक कादंबरी मध्ये सुगरणीच्या कौशल्याने करून घेतो . माणूस , त्याचा स्वार्थ , त्याच्या भावना , त्याच्या गरजा , त्याच्या अपरिहार्यता , प्रेम , सूड , निर्व्याजता या सर्व विषयांच्या भोवती कादंबरी फिरते . विशिष्ट दुर्गुणांसाठी एखाद्या समाजाला संपूर्ण दोषी धरावं का ...

पुस्तक परिचय ३: पंख

एखाद्याची खूप स्वप्न असतात . ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ते गुण सुद्धा असतात पण , काही घटना अशा घडतात , अशी परिस्थिती निर्माण होते की तो ती स्वप्ने पूर्ण करायला पूर्णतः असमर्थ ठरतो . मग अशा व्यक्तीला बघून सर्व लोक " अरे अरे दुर्दैवी माणूस " असे म्हणायला लागतात . कधीकधी असा माणूस काही कारणांमुळे थट्टेचा विषय होतो . मग असा माणूस त्याचं स्वप्न ज्या क्षेत्रात असतं त्या क्षेत्राशी निगडित राहण्याचा प्रयत्न करतो . त्यासाठी पदरी पडणारा सर्व अपमान गिळतो .   ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मनाला प्रसन्नता मिळावी म्हणून कुठल्याही व्यवहारी गोष्टीचा विचार करत नाही . स्वार्थी लोकांकडे जाणूनबुजून डोळेझाक करतो . या आणि अशाच विषयावर असलेली वसंत कानेटकरांची कादंबरी म्हणजे , " पंख ". कादंबरी वाचताना  बहुतांश प्रसंगी वाचकाचा जीव हळहळतो. पण, त्या हळहळण्यात सुद्धा कादंबरीच्या सौंदर्याची किनार आहे. पुढे,  कादंबरी चा उत्तरार्ध असा रंजक होतो , अशा घटना घडतात की मग ...