Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

सफर कर्नाटकची: भाग तिसरा आणि शेवटचा

एखाद्या ठिकाणी आपण का फिरायला जातो? तर, ती जागा "अतिशय unique, अतिशय वेगळी" असते म्हणून.  आधी हम्पी ही जागा नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊ. हम्पी म्हणजेच पंपा हे शहर विजयनगर च्या साम्राज्याची राजधानी होती. विजयनगरचं साम्राज्य जवळपास २५० वर्षं होतं. आता विचार करा, की अडीचशे वर्ष एखाद्या साम्राज्याची राजधानी असलेलं शहर किती भव्य आणि किती सुंदर वसवलं गेलं असेल. महाराष्ट्रात रायगडावर महाराजांचा महाल, राणीवसा, प्रधानांचे वाडे, टांकसाळ या सगळ्या गोष्टी दिसतात पण, हम्पी हे अख्खे राजधानी चे शहर पाचशे वर्षांपूर्वी आराखडा बनवून वसवलेलं असल्यामुळे हे पाहण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. तर, मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे दुसऱ्या दिवस अखेर आमचा प्रवास हम्पी च्या दिशेनी सुरू झाला. हम्पी च्या वेशीवरच्या मुख्य चौकात पोहोचलो तेव्हा तिथे काही गाईड मंडळी गप्पा मारत बसली होती. त्यातल्या एकाला निश्चित केले आणि तो आम्हाला तुंगभद्रेच्या काठावर घेऊन गेला. गोलाकार होडीत बसून आम्ही नदीच्या पात्रात उतरलो. अवती भवती सर्वत्र दगडांचे डोंगर होते. नावेतून थोडं पुढे तो आम्हाला सूर्य मंदिराकडे घेऊन गेला. काही ...

सफर कर्नाटकची: भाग दुसरा

मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे आम्ही सोलापूर मार्गे कर्नाटक ला जायला निघालो. दौऱ्याच्या पहिल्या रात्री आम्ही बदामी येथे मुक्कामाला थांबणार होतो. जाता जाता वाटेत विजापूर लागतं. विजापूर बद्दल आपण सर्वांनीच शाळेत शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाचलेलं असतं. त्यामुळे तिथे काही बघता येईल का असा विचार केला. विजापूर मध्ये गोल गुंबज बराच प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथे जायचा निर्णय घेतला.  गोल गुंबज म्हणजे मुहम्मद आदिलशहाची कबर. आता या शाही समाधी चं बांधकाम त्यानी स्वतः च्या हयातीत सुरू केलं. खरी समाधी तळघरात तर, दाखवायची समाधी मुख्य मंडपात. समाधी ची जागा प्रचंड भव्य आहे. एकूण नऊ मजली इमारत आहे. नवव्या मजल्यावर गुमट आहे. गुमटाच्या एका बाजूला हळु आवाजात बोलले तरी दुसऱ्या बाजूला १८० अंशावर ऐकू येते. त्याच जागेवर एक लहानसे संग्रहालय पण आहे. पुण्याहून निघाल्यावर साधारण सात तासात आम्ही या जागी पोहोचलो. राष्ट्रीय महामार्गाच्या लगत हे शहर असल्यामुळे कुठल्याही अडचणी शिवाय इथे पोहोचलो. विजापूर मध्ये अन्य जागा बघण्यासारख्या आहेत पण, आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही ही एकच जागा बघितली. एखाद दोन तासात ही ज...

सफर कर्नाटकची: भाग पाहिला

आता कर्नाटक च्या सुट्टीची गोष्ट सांगतो. मित्र श्रेयस ला म्हटलं खूप दिवसांत कुठे गेलो नाही त्यामुळे जाऊयात. कर्नाटकातल्या हम्पी - बदामी या जागांबद्दल बरच ऐकलं होतं त्यामुळे तिथे जायचं ठरलं. कर्नाटक बद्दल खूप कुतूहल आधीपासूनच होतं. गाडीनी पुण्याहून सोलापूर मार्गे कर्नाटकच्या दिशेनी निघालो. जाता - जाता वाटेवर सोलापूर - मंगळवेढा - पंढरपूर - उजनीचं धरण या काही जागा दिसतात. साधारण सोलापूर पासून कर्नाटकी पद्धतीत बोलणारी माणसं दिसायला लागतात. कर्नाटकच्या ज्या भागात आम्ही फिरलो ती सगळी गावं तशी फार शांत होती. अर्थात्, मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांना बाकीच्या सगळ्याच जागा तशा शांतच वाटतात. पण, स्वांत - सुखाय असा निवांतपणा या भागात जाणवला. अवती भवती सगळे खनिजांचे साठे त्यामुळे खाणीत दिवसभर काम आणि बाकी आयुष्य आरामात घालवणे हा इथल्या लोकांचा दिनक्रम.  हवेत देशावरचा कोरडेपणा पण समुद्रावरच्या संस्कृती चा प्रभाव असल्यामुळे सगळीकडे लावलेली नारळाची झाडं. लोकांमध्ये उत्तरेतून कोणी आलंय किंवा परभाषी कोणी आलेत हा भाव अजिबातच नव्हता. त्याउलट आश्चर्यकारकपणे अनेकांना मराठी बोलता येतं हेच लक्षात आलं....