Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया दौरे

ऑस्ट्रेलियातले कसोटी क्रिकेट सामने भारतीय प्रेक्षकांसाठी नेहमीच विशेष असतात. मला आठवतं, शाळेत असताना सकाळी सगळं लवकर आवरायचं असायचं आणि डिसेंबर मधल्या सकाळी ऑस्ट्रेलियातला कसोटी सामना सुरू झालेला असायचा. आमचे आजोबा आवर्जून पहिल्या चेंडू पासून मॅच बघत. Justin Langer आणि Mathew Hayden त्यांच्या डावाची सुरुवात करत. चहाच्या पहिल्या घोटाबरोबर क्रिकेट सामन्याचा आनंद त्या डिसेंबर च्या थंडीत लोक घेत असत. १९९९, २००३ आणि २००८ हे तीन ऑस्ट्रेलिया चे दौरे मला चांगले आठवतात. अर्थात्, १९९९ साली माझं वय अवघं ७ वर्षाचं असल्यामुळे मला फारसं क्रिकेट समजत नव्हतं. पण, त्या दौऱ्याची जाहिरात "Tendulkar vs Warne" अशी प्रचंड प्रमाणात करण्यात आली होती. ९० च्या दशकातल्या त्या आपल्या संघात potential खूप पण आपल्या स्वतःलाच त्याची जाणीव नव्हती. आपण चांगलाच मारही खाल्ला.  पण, २००३ च्या दौऱ्याची बातच काही और होती. स्पृहणीय होती. आता सौरव गांगुलीचा नवा डोळ्यात डोळे घालून पाहणारा संघ होता. त्यांना आपण त्यांच्याच देशात जाऊन दे माय धरणी ठाय करून सोडलं. कदाचित विश्वचषकातल्या पराभवाचा सुड उगवायचा असेल आपल्या संघा...