Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

पुस्तक परिचय २ : एक होता कार्व्हर

"एक होता कार्व्हर" हे शीर्षकच इतके बोलके आहे की त्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की लेखिकेला कथा सांगण्यात रुची आहे. देशकाल स्थल परिस्थिती भिन्न असलेल्या एखाद्या महापुरुषाचं चरित्र लिहिणे हे एक कठीण काम असते. त्यातही जर ते चरित्र कुठल्याही वयातल्या व्यक्तीनी वाचावं आणि त्यातून बोध घ्यावा अशा पद्धतीनी लिहायचं असेल तर मग हे काम अजूनच कठीण होते. "एक होता कार्व्हर" च्या बाबतीत हे अतिशय कठीण काम लेखिका वीणा गवाणकर यांनी अतिशय यशस्वीपणे केलेले आहे.  "एक होता कार्व्हर" हे थोर अमेरिकन कृषीतज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे कादंबरीवजा लघुचरित्र आहे. कथा सहजपणे फुलवत फुलवत लेखिका जाते आणि आपण एका सुंदर कलाकृतीच्या आस्वादाबरोबरच एका अज्ञात पण अतिशय अभ्यासू आणि सृजनशील व्यक्तीच्या आयुष्याची सुंदर सफर करत आहोत असे वाचकाला वाटत राहते. त्यामुळे पुस्तक पूर्ण केल्याशिवाय हातातून सोडवत नाही . १९ व्या शतकातील अमेरीका, तिथली गुलामगिरीची प्रथा आणि निग्रोंना होणारे त्रास, त्यांच्या भयानक समस्या यांची देखील वाचकाला कल्पना येते.   लेखिका आत्या, बाई, बाबा या भारतीय नात्यांची उपमा ...

पुस्तक परिचय १: शककर्ते शिवराय

कुठल्याही महापुरुषाच्या चरित्राचे स्वाभाविकपणे प्रेरकमुल्य असते आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्राच्या बाबतीत तर ते अधिकच . कथारूपानी अत्यंत लालित्यपूर्ण आणि इतिहासाला प्रमाण ठेवून अनेक लेखकांनी शिवछत्रपतींचे चरित्र लिहिले . परंतु , हे चरित्र जे आपल्या समोर मांडल्या जाते आहे ते नेमके कशाच्या आधारावर मांडले जाते आहे , त्या पाठीमागे नेमका काय तर्क आहे याची कल्पना वाचकाला क्वचितच असते . शिवछत्रपतींच्या चरित्राच्या बाबतीत हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न म्हणजे " शककर्ते शिवराय " हे द्विखंडात्मक शिवचरित्र होय . प्रस्तुत चरित्र हे कथेच्या शैली मध्ये मांडण्यात आले आहे . वापरलेली भाषा अतिशय सोपी सहज समजेल अशी आहे . अनावश्यक मोठ - मोठे शब्द कुठेही वापरलेले नाहीत . चरित्रकारानी शिवचरित्राची पार्श्वभूमी ( म्हणजे शिवपूर्वकालीन परिस्थिती - भारतातील आणि महाराष्ट्रातील ) अत्यंत विस्तारानी आणि मुद्देसूद मांडलेली आहे . त्याच प्रमाणे महाराजांच्या मातृकूळ आणि पितृकुळावरही अत...