Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

राष्ट्रीय सुरक्षेचा आक्रमक अवतार

तीन वर्षांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला चढवला. युक्रेन नाटो राष्ट्रांच्या समूहात सहभागी होणार नाही, तसेच युक्रेनकडे स्वतःचे सैन्य सुद्धा असणार नाही अशा दोन अटी पुतीन यांनी ठेवल्या.  आता नाटो राष्ट्र म्हणजे काय हे समजून घेऊ. नाटो राष्ट्रांचा समूह म्हणजे युरोप आणि उत्तर अमेरिकन देश यांमधील सैनिकी युती. समूहातल्या कुठल्याही एका देशावर आक्रमण झालं तर अन्य सर्व देश त्या देशाची मदत करतील असा करार या नाटो राष्ट्रांमध्ये असतो. युक्रेन हा देश नाटो राष्ट्रांच्या समूहात जाऊ इच्छित होता.  तर रशियाला युक्रेननी या नाटो राष्ट्रांच्या समूहात जाऊ नये असं वाटत होतं. याचं कारण अतिशय स्पष्ट होतं. रशियाला आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये अमेरिकेची आणि युरोपची ढवळाढवळ नको होती. आपल्या देशाच्या सामरिक सुरक्षेला या नाटो करारामुळे धोका पोहोचू शकतो हे पुतीन यांनी हेरलं. युक्रेन ऐकत नाही हे पाहिल्यावर त्यांनी युक्रेन वर हल्ला चढवला.  हल्ला चढवल्यावर पुतीन यांना हुकूमशहा आणि अनेक निरपराध लोकांच्या हत्येला जबाबदार धरण्यात आलं. रशियाला जागतिक राजकारणात एकटं पाडण्यासाठी अमेरि...