Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

डॉक्टर हेडगेवार

डॉक्टरांच्या जयंतीच्या निमित्ताने: संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीवर शब्दरूपी पुष्प वाहण्याचा प्रयत्न. डॉक्टर हेडगेवार हे नाव जरी कोणी उच्चारले तरी पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहत नाहीत. कारण ते जीवनच तसे होते. अत्यंत ततःपुत , वात्सल्यापूर्ण, त्यागी, वासनाशुन्य, तेजस्वी, अत्यंत बलवान (वास्तविक शब्दच थिटे पडतात) असे हे व्यक्तित्व. डॉक्टरांचं चरित्र बघितलं की हे लक्षात येतं की, डॉक्टरांच्या आयुष्यात डोळे दिपवणारे, खूप प्रसिद्धी देणारे प्रसंग फार कमी आहेत (उदाहरणार्थ: तात्याराव सावरकरांच्या बाबतीत मार्सेलीस ची उडी, चापेकर बंधूंच्या बाबतीत रँड चा वध इत्यादी). डॉक्टरांच्या बाबतीत अनेक गोष्टी अत्यंत सहज होत्या. त्यांच्या चारित्रामध्ये triggering points पण फारसे दिसत नाहीत (उदाहरणार्थ: चापेकर बंधूंना फाशी झाल्याची बातमी ऐकून सावरकरांनी केलेली स्वातंत्र्याची प्रतिज्ञा इत्यादी). देशभक्तीची भावना, डॉक्टरीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील विवाह आणि डॉक्टरी न करता संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित करण्याचा निर्णय अत्यंत सहज दिसून येतो. कुठल्याही गवगव...