एक अप्रतिम अनुभव: "The Crown "ब्रिटन, ब्रिटिश लोक, त्यांच्या संसदेची भली मोठी इमारत, त्यांच्याकडची अजूनही असलेली राजेशाही ही आपल्याकडे अजूनही आकर्षणाचा, टीकेचा, रागाचा भाग आहे. राग आणि टीका यासाठी की त्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं. आकर्षणाचा भाग यासाठी की त्यांच्या राणीचं गॅलरी मधून हात दाखवणं, त्याच्यासाठी लोकांचं रस्त्यावर येणं, राजघराण्यातल्या लोकांचे शाही विवाह, त्यासाठी बग्गीतून निघणाऱ्या मिरवणुका या सर्व गोष्टींमुळे. राजेशाही हा ब्रिटिश राष्ट्रजीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे नक्की. राजेशाही म्हणजे आपल्याकडे जसा राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असतो तसा तिथे राजा किंवा राणी राज्याची प्रमुख असते. इंग्लंड ची राणी एलिझाबेथ दुसरी ही त्यांच्या इतिहासातली सर्वाधिक काळ राज्यावर असलेली राणी ठरली. तिच्या काळात, तिच्या घरात आणि ब्रिटन मध्ये अनेक घटना घडून गेल्या. अनेक वादळं आली, अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या. अशा या राणी एलिझाबेथ वर एक उत्तम वेब सिरीज होऊ शकते असं तिथल्या प्रतिभावान लोकांना वाटलं आणि त्यातून "The Crown" ही एक अप्रतिम कलाकृती जन्मली. ही एलिझाब...