साहित्य, संगीत, चित्रपट, शिल्पकला या माणसाला सौंदर्यदृष्टी देणाऱ्या आणि म्हणूनच माणूस म्हणून श्रीमंत करणाऱ्या गोष्टी आहेत. जगभरात या सर्व क्षेत्रात नवनवे प्रयोग केल्या गेले आणि त्यातून उत्तम कलाकार आणि कलाकृती घडत गेल्या. या सगळ्या मंथनातून मग आपल्याला ब्रिटिश रंगभूमीवर benedict cumberbatch किंवा Olivia Colman सारखे नट पाहायला मिळतात. मराठीत तर या सगळ्या प्रयोगांचा सुकाळ. संगीतनाटक मग त्यात वेगवेगळ्या रागातल्या घेतलेल्या चिजा, ती सादर करण्याची बालगंधर्वांसारख्या नटानी बदललेली पद्धत या सगळ्या गोष्टी आम्हाला अर्थातच श्रीमंत करून गेल्या. चांगलं काय वाईट काय, त्यातून घ्यायचं काय, टाकायचं काय हे कलासृष्टीला आणि रसिकांना सुद्धा उत्तम समजतं. म्हणूनच मग एखाद्या गोष्टीची dark side जास्त दिसणाऱ्या विजय तेंडुलकरांना बरोब्बर "सिंहासन" सारख्या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचं चपखल काम दिल्या जातं आणि तो प्रयोग अर्थातच यशस्वी होतो. या सर्व गोष्टी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अर्थातच नोंदवल्या जात असतील. पण, या सर्व अनुभवांना, प्रयोगांना एका मालिकेच्या, मुलाखतीच्या रूपात चित्रीत करून रसिकांना आ...