Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

डॉक्टर हेडगेवार: चरित्र आणि चरित्रकार

एखाद्या महापुरुषाबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करण्यात त्या महापुरुषाच्या चरित्रकाराचा अतिशय मोठा वाटा असतो. विशेषतः जेव्हा त्या व्यक्तीचे निधन होऊन अनेक वर्षं लोटलेली असतात आणि त्या व्यक्तीला पाहिलेली फारच थोडी माणसे हयात असतात. डॉक्टर हेडगेवार यांचे ना. ह. पालकर यांनी लिहिलेले चरित्र पाहिले की याचा प्रत्यय येतो.  खरंतर, डॉक्टर खूप प्रसिद्धीच्या झोतात असे राहिलेच नाहीत. एकदा ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्यामुळे आणि एकदा जंगल सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास घडला. विदर्भ - मध्य भारतातले एक स्वातंत्र्य चळवळीतले नेते म्हणून ते सुपरिचित होते मात्र, प्रसिद्धी पासून तसे ते दूरच होते.  डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातली खरी मेख ही जगाला दिसू लागली - जेव्हा संघ कार्य हळूहळू वाढू लागलं आणि संघाचे कार्यकर्ते जेव्हा समाजावर काहीतरी परिणाम करु लागले. त्यामुळेच डॉक्टर हेडगेवार नेमके कसे होते. त्यांचं वागणं, बोलणं, व्यवहार म्हणजेच एक प्रकारे डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा हा मध्यवर्ती ठेऊन ना. ह. अर्थात् नाना पालकर यांनी डॉक्टरांचे चरित्र लिहिले.  एखाद्या मह...

मध्यमवर्गीय माणसाचे डोळे खाडकन् उघडणारी निवडणूक

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. भारतीय जनता पक्ष बहुमताला ३५ जागांनी कमी पडला. पण, मित्रपक्षांच्या साथीने सरकार बनवू शकला.  निवडणुकीचे आकडे पाहिले तर, २० जागा अशा आहेत की जिथे भाजपाचा तीन हजार ते तीस हजार या दायऱ्यात पराभव झाला. तर, काही जागा भाजप अगदी थोडक्यात जिंकला.  मतदानाची टक्केवारी पाहिली तर ६५.७९% टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा साधारण एक ते सव्वा टक्क्यांनी कमी आहे. ६४.२० कोटी लोकांनी मतदान केलं. आता, जर गेल्या निवडणुकी प्रमाणे यंदाही ६७% मतदान झालं असतं तर ६० लाख अधिक लोकांनी मतदान केलं असतं. आता या अधिकच्या ६० लाख लोकांत कोण कुठल्या पक्षाचा मतदार आहे हा भाग राजकीय तज्ज्ञ अभ्यास करतील.  पण, एक बाब जी माझ्या लक्षात आली ती म्हणजे, मध्यमवर्गीय समाज हा मतदानाच्या बाबतीत काही प्रमाणात उदासीन आहे. जर, मतदानाला जाणं शक्य झालं तर ठीक नाहीतर राहू देऊ असा विचार मध्यमवर्गीय करतात. विशेषतः जी मंडळी बाहेरगावी असतात ती किंवा जी मंडळी मतदानाच्या दिवशी गावात नसतात त्या मंडळीत असा विचार दिसतो.  याचा परिणाम काय होतो हे सांगायला...