Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

नरेंद्र मोदी, त्यांचं सरकार आणि त्याची आठ वर्षे

२०१४ हे वर्ष या शतकातलं राजकीय दृष्ट्या सर्वात उलथापालथ करणारं ठरलं. याचं कारण, राजकारण्यांच्या विषयीची भारतीय जनमानसात असलेली प्रचंड उदासीनता. ढिसाळ, हळू, लोकांशी कुठलाही संवाद नसलेला कारभार ही या उदासीनतेची प्रमुख कारणं. या सर्व उदासीनतेला छेद देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे नरेंद्र मोदी असा भारतीय जनमानसाला विश्वास वाटला आणि त्यातून नरेंद्र मोदी या राष्ट्रीय नेतृत्वाचा उदय झाला.  संपुर्ण बहुमताचं सरकार घेऊन नरेंद्र मोदींचा सत्ताप्रवास सुरु झाला. सुरूवात मोठी दमदार झाली. कारण, शपथविधीला पाकिस्तान चे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना विशेषत्वानी मोदींनी निमंत्रीत केलं. अर्थात्, सर्वच सार्क देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण होतं; त्यात पाकिस्तान एक. पण, त्या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या कारण, मागच्या अनेक वर्षापासून पाकचं भारताबाबतचं आडमुठं धोरण. तरीदेखील मोदींनी नवीन सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी अत्यंत कार्यक्षम, लोकांशी संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्या प्रतिमेला अनुसरून त्यांनी आपले काम सुरू केले. "मन की बात" नावाचा आकाशवाणी वर कार्यक्रम सुरु करुन त्यांन...