Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रीय फूटपट्ट्या

नागपूर. देशाचा मध्यबिंदू. या मध्यबिंदू शब्दातच नागपूरचं सगळं वर्णन येतं. पूर्व - पश्चिम - उत्तर - दक्षिण या चारही भागातली संस्कृती आपलीशी करून त्याच्या आधारे स्वतःची संस्कृती निर्माण करणारं शहर म्हणजे नागपूर. त्यामुळे शासकीय दृष्ट्या जरी महाराष्ट्रातील शहर असले तरी अन्य महाराष्ट्रीय शहरांचे गुणधर्म नागपुरात सापडत नाहीत. (या गोष्टीचं नागपूरकरांना काहीही सोयरसुतक नाही; त्यामुळे इतरांनी अनावश्यक कंठशोष करू नये; त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कृपया हे वाक्य हलक्यात घ्यावं). जेमतेम तासभर दुचाकीवर प्रवास केलात तर मध्यप्रदेश सुरु होतो. २-४ तास प्रवास केला तर छत्तीसगढ सुरु होतो. १५० कि.मि वर असलेल्या चंद्रपूरात तेलगू भाषेतल्या पाट्या सुद्धा दिसतात (तेलंगणा जवळ असल्यामुळे). पश्चिमेकडे मराठी बहुल भाग आहे. त्यामुळे नागपूर हे बहुसांस्कृतिक शहर आहे. त्याच्यावर एका कुठल्या संस्कृतीचा शिक्का कोणी मारू शकत नाही. नागपुरात जसे मराठी भाषिक लोक राहतात तसे सिंधी, मारवाडी, मध्य प्रदेश, छत्तीसगडातले लोकही भरपूर प्रमाणात राहतात. नागपूरकर मंडळींना भाषा ही अस्मितेपेक्षा संवादाचे साधन अधिक वाटते त्यामु...