Skip to main content

विश्वसंचार

 "विश्वसंचार" हे मल्हार कृष्ण गोखले यांचे सदर तरुण भारताच्या आसमंत पुरवणीत पाहिले की लोक त्यावर अक्षरशः तुटून पडतात. ज्या वाचकाला रोचक, खुसखुशीत, जगाच्या वेगवेगळया कानाकोपऱ्यातल्या घटनांमध्ये रस आहे अशा वाचकांसाठी हे सदर म्हणजे अक्षरशः पर्वणी आहे. 

अमेरिकेतला अंकल सॅम, लंडन चा शेक्सपियर, पूर्व - पश्चिम युरोप यांच्यातला संघर्ष, आफ्रिकेतल्या कथा, कालिकत च्या बंदरावर उतरलेल्या वास्को द गामा च्या नोंदी या आणि अशा शेकडो गोष्टी. 

आश्चर्य म्हणजे हे सदर गेल्या दोन दशकापासून लोकप्रियपणे चालू आहे. पण, यावरून लेखनाच्या दर्जाची कल्पना येऊ शकेल. 

नुसती उत्तम माहिती देऊन जसा उपयोग नाही तसंच, केवळ लेखनशैली उत्तम असूनही होत नाही; दोघांचा संगम लागतो. तसंच, लिहिलेलं एका काळानंतर रटाळ वाटू नये याची दक्षता लेखकाला घ्यावी लागते. 

आश्चर्य म्हणजे, गोखल्यांचं हे सदर कधीही एकसुरी, रटाळ, अनावश्यक अलंकारिक किंवा माहितीचा अतिरेक असलेलं वाटत नाही. माहिती किती द्यायची, कुठे थांबायचं त्यावर भाष्य कधी करायचं, समाजाला त्यातून बोध किती कुठे आणि कसा द्यायचा हे कसब लेखकाकडे उत्तमरित्या आहे. 

अनेक स्तंभलेखक हे विचारवंत असतात. त्यांच्या लेखाची ढब ही साधारण त्याच धाटणीची असते. मात्र, गोखल्यांच्या लेखांतून जगातल्या घटना आणि त्यातून आपल्या परंपरा; त्यातलं श्रेष्ठत्व हे नकळतपणे अधोरेखित होतं. अशा प्रकारे, गोखले नकळतपणे समाजाला बोध देऊन विचारवंतांचे काम करत असतात.

जगातल्या वेगवेगळया प्रथा, परंपरा आणि त्यावर भाष्य करणारे गोखले मात्र आपल्या लेखांतून राष्ट्रीय विचारधारेशी कुठेही तडजोड करीत नाहीत. आमच्या परंपरा, प्रथा, आमचा धर्म, आमची अनादी कालापासून असलेली संस्कृती ही निर्विवादपणे श्रेष्ठ कशी हेच ते शिवछत्रपती, आद्य शंकराचार्य किंवा टिळक - सावरकरांच्या उदाहरणातून सांगतात.

अनेक वेळेस असा विचार येतो की जगात वर्तमानात घडणाऱ्या आणि इतिहासात घडलेल्या घटना यांचा अभ्यास करत राहणे आणि त्या चौकसपणे लेखासाठी टिपणे याला किती परिश्रम लागत असतील. 

या सर्व गोष्टींमुळे विश्वसंचार हे सदर इतर सदरांच्या पेक्षा हटके आहे. म्हणूनच विश्वसंचार वाचायला हवे. सदराची लिंक खाली देतो आहे.

https://www.mahamtb.com/authors/mhalar_gokhale.html

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...