एखाद्याची खूप स्वप्न असतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ते गुण सुद्धा असतात पण, काही घटना अशा घडतात, अशी परिस्थिती निर्माण होते की तो ती स्वप्ने पूर्ण करायला पूर्णतः असमर्थ ठरतो. मग अशा व्यक्तीला बघून सर्व लोक "अरे अरे दुर्दैवी माणूस" असे म्हणायला लागतात. कधीकधी असा माणूस काही कारणांमुळे थट्टेचा विषय होतो. मग असा माणूस त्याचं स्वप्न ज्या क्षेत्रात असतं त्या क्षेत्राशी निगडित राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी पदरी पडणारा सर्व अपमान गिळतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मनाला प्रसन्नता मिळावी म्हणून कुठल्याही व्यवहारी गोष्टीचा विचार करत नाही. स्वार्थी लोकांकडे जाणूनबुजून डोळेझाक करतो. या आणि अशाच विषयावर असलेली वसंत कानेटकरांची कादंबरी म्हणजे, "पंख".
कादंबरी वाचताना बहुतांश प्रसंगी वाचकाचा जीव हळहळतो. पण, त्या हळहळण्यात सुद्धा कादंबरीच्या सौंदर्याची किनार आहे. पुढे, कादंबरी चा उत्तरार्ध असा रंजक होतो, अशा घटना घडतात की मग पुढे आपण वाचतच जातो. नाटककाराची कादंबरी असल्यामुळे कादंबरीच्या कथेत सुद्धा एक नाट्य आहे.
कादंबरी चा नायक हा एक अतिशय सामान्य व्यक्ती आहे. कादंबरीची कथा थेट मनाला स्पर्श करते आणि भावनिक सुद्धा करते.
या
कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य
म्हणजे काही संमिश्र व्यक्तिरेखा
(आजच्या भाषेत सांगायचे तर "ग्रे" characters). लेखकानी अत्यंत वकुबानी या व्यक्तिरेखा उभ्या
केल्या आहेत. आपल्याला हे लक्षात येत
नाही की अमुक एखादं
पात्र हे सकारात्मक आहे
की नकारात्मक आहे. या संदिग्धतेमुळे
कादंबरी च्या सौंदर्यात अधिकच
भर पडली आहे. वाचकांना त्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे त्या पात्रांचा रंग
ठरवण्याची जागा लेखकानी ठेवलेली
आहे.
१९५०
च्या दशकात लिहिलेली कादंबरी असल्याने त्या वेळचे संदर्भ
कादंबरीत येतात.
नाटककार
म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानेटकरांच्या अगदी काही मोजक्या
कादंबऱ्यांपैकी ही एक आहे.
कादंबरी पूर्वीच्या निवेदनात कानेटकर म्हणतात, "नाट्यलेखनाच्या भोवऱ्यात सापडल्यापासून कादंबरीलेखनाचे माझे पंखच कापल्यासारखे
झाले आहेत. तथापि कादंबरीलेखनाचे संकल्प करायचे मात्र मी सोडून दिले
नाहीत. कधीतरी कादंबरीलेखनाकडे वळणे मला अटळ
होणार आहे याची मला
जाणीव आहे."
तर
अशी ही "पंख" कादंबरी सर्वांनी नक्की वाचावी अशी.
- देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

सुंदर 👌
ReplyDelete