Skip to main content

पुस्तक परिचय ३: पंख

एखाद्याची खूप स्वप्न असतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक ते गुण सुद्धा असतात पण, काही घटना अशा घडतात, अशी परिस्थिती निर्माण होते की तो ती स्वप्ने पूर्ण करायला पूर्णतः असमर्थ ठरतो. मग अशा व्यक्तीला बघून सर्व लोक "अरे अरे दुर्दैवी माणूस" असे म्हणायला लागतात. कधीकधी असा माणूस काही कारणांमुळे थट्टेचा विषय होतो. मग असा माणूस त्याचं स्वप्न ज्या क्षेत्रात असतं त्या क्षेत्राशी निगडित राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी पदरी पडणारा सर्व अपमान गिळतो.  ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मनाला प्रसन्नता मिळावी म्हणून कुठल्याही व्यवहारी गोष्टीचा विचार करत नाही. स्वार्थी लोकांकडे जाणूनबुजून डोळेझाक करतो. या आणि अशाच विषयावर असलेली वसंत कानेटकरांची कादंबरी म्हणजे, "पंख".

कादंबरी वाचताना बहुतांश प्रसंगी वाचकाचा जीव हळहळतो. पण, त्या हळहळण्यात सुद्धा कादंबरीच्या सौंदर्याची किनार आहे. पुढे, कादंबरी चा उत्तरार्ध असा रंजक होतो, अशा घटना घडतात की मग पुढे आपण वाचतच जातो. नाटककाराची कादंबरी असल्यामुळे कादंबरीच्या कथेत सुद्धा एक नाट्य आहे.

कादंबरी चा नायक हा एक अतिशय सामान्य व्यक्ती आहे. कादंबरीची कथा थेट मनाला स्पर्श करते आणि भावनिक सुद्धा करते.

या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही संमिश्र व्यक्तिरेखा (आजच्या भाषेत सांगायचे तर "ग्रे" characters). लेखकानी अत्यंत वकुबानी या व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत. आपल्याला हे लक्षात येत नाही की अमुक एखादं पात्र हे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे. या संदिग्धतेमुळे कादंबरी च्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.  वाचकांना त्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे त्या पात्रांचा रंग ठरवण्याची जागा लेखकानी ठेवलेली आहे.

१९५० च्या दशकात लिहिलेली कादंबरी असल्याने त्या वेळचे संदर्भ कादंबरीत येतात.

नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानेटकरांच्या अगदी काही मोजक्या कादंबऱ्यांपैकी ही एक आहे. कादंबरी पूर्वीच्या निवेदनात कानेटकर म्हणतात, "नाट्यलेखनाच्या भोवऱ्यात सापडल्यापासून कादंबरीलेखनाचे माझे पंखच कापल्यासारखे झाले आहेत. तथापि कादंबरीलेखनाचे संकल्प करायचे मात्र मी सोडून दिले नाहीत. कधीतरी कादंबरीलेखनाकडे वळणे मला अटळ होणार आहे याची मला जाणीव आहे."

तर अशी ही "पंख" कादंबरी सर्वांनी नक्की वाचावी अशी.


- देवाशीष विनोद सहस्रबुद्धे


           

 

 

 

 

 

             

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...