Skip to main content

एक सांगीतिक अनुभव

दि. ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०१६ दरम्यान झालेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती आंतरराष्ट्रीय संगीत समारोहाचा अनुभव सांगतो. वर्तमानपत्रात समारोहाची जाहिरात वाचली; तेव्हा कळलं की समारोहात पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अमजद अली खान, शिवमणी, प्रवीण घोडखिंडी, रशीद खान, पं. व्यंकटेश कुमार, राहुल देशपांडे हे सर्व दिग्गज आपली कला सादर करणार आहेत. एवढे दिग्गज (नागपुरी भाषेत "तोफचंद") एकाच महोत्सवात येत असल्यावर कोणी रसिक अशी संधी सोडेल?. अर्थातच नाही.
सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर दीपमाळ, व्हरांड्यात भीमसेनजी आणि मास्टर दीनानाथांच्या सुंदर रांगोळ्या, फुलांनी शृंगारलेला रंगमंच, त्या फुलांचा संपूर्ण सभागृहभर दरवळत असलेला सुगंध, त्याच्या जोडीला या सर्व दिग्गजांनी आळवलेला एक एक स्वर आणि त्याच्यावर आपले प्राण कानाशी एकवटून एक एक स्वर साठवणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी म्हटलेले वाह!!!!
हे सारे आजही आठवले तरी मला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो;असं वाटतं की त्याच्यातच तरंगत राहावं.
ताकाहीरो अराई नावाच्या एका संतूर वादकानी तर इतकी सुंदर संतूर वाजवली की त्याचं संतूरवादन संपल्याच्या दोन तासानंतरही मी संतूरच ऐकतो आहे असं मला वाटत होतं. ओजस अधियाने शिवमणी बरोबर वाजवलेला तबला कसा होता हे तर फक्त अनुभवल्याच जाऊ शकते; त्याचं शब्दात वर्णन करण्याचं माझं सामर्थ्य नाही.
हरिप्रसाद चौरासियांचं बासरीवादन ऐकायला मिळालं; अक्षरशः भरून पावलो. उस्ताद अमजद अली खान सरोद वाजवतात आहेत म्हटल्यावर लोक वेळ काळाची पर्वा न करता रात्री १२.३० वाजेपर्यंत तल्लीन होऊन कार्यक्रम ऐकत होते.
अजून लिहिण्यासारखं खूप आहे; पण लिहीत बसलो तर कदाचित फेसबुक नी पोस्ट लिहायला दिलेली जागा कमी पडेल आणि कितीही लिहिलं तरी त्या तपस्वी गंधर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे वर्णन करण्यात माझी लेखणी थिटी पडेल.
अजून काय लिहू? असं म्हणतात कि अनुभूती ला अनुभूतीनीच समजावं लागतं.

✍️देवाशीष विनोद सहस्रबुद्धे

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...