Skip to main content

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला - एक interpretation


काही दिवसापूर्वी मी माझी गाडी एका दुकानासमोर लावत होतो. तेव्हा तिथल्या दुकानदारानी मला स्मितहास्य करत सांगितले की , "भैया, प्लीज यहाँ पर गाडी मत लगाओ।". मी "ठीक है" म्हणत लगेच गाडी दुसरीकडे लावली.

आता हेच त्यानी मला उडवाउडवीच्या थाटात सांगितले असतं तर मी पण म्हंटलं असतं की, आता तर मी इथेच गाडी लावतो;
आणि मग संघर्ष उभा राहिला असता.

त्या दुकानदारानी काय केलं?

तर, आपलं इप्सित साध्य करण्याकरता माझा ego जपला. तो त्याच्यापरी बरोबरच होता पण त्यानी ती गोष्ट कशा प्रकारे सांगितली या गोष्टीला महत्त्व आहे.

कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देताना सांगितले जाते की, The pitch and the tone of the voice matters most in an effective communication.

कदाचित भारतीय परंपरेमध्ये effective communication चा धडा देण्यासाठीच "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणण्याचे प्रयोजन असेल काय?

मोठ- मोठ्या संघटना या यशस्वी होण्या मागे त्यांच्या कार्यकर्त्यांची संवाद साधण्याची हातोटी कारणीभूत आहे. "तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मी आता जे सांगितलं तसा तू विचार करून पहा" असं म्हणत एका एका व्यक्तीला आपल्या बाजूला उभं करण्यात ही संवादाची कला खूप उपयोगाची आहे.( पण सत्याचा आधार असला पाहिजे बरं!)

ज्ञानेश्वर महाराजांनी तर, effective communication चा Best possible outcome सांगितला आहे फक्त चार शब्दात, "या हृदयीचे त्या हृदयी"

पण हे "या हृदयीचे त्या हृदयी" साध्य करण्यासाठी मध्ये येणारी जिव्हा आणि त्याचा मन, बुद्धी, विचार यांच्या जोडीनी होणारा उपयोग आणि त्याचा समोरच्यावर होणारा परिणाम याचा विचार आपण "तिळगुळ घ्या गोडगोड बोला" च्या निमित्ताने केला पाहिजे असं वाटतं.

✍️ देवाशीष विनोद सहस्त्रबुध्दे

Comments

Popular posts from this blog

नियतीचा क्रूर खेळ आणि रंगलेला कलगीतुरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार दि. २८ जानेवारी ला निधन झाले. स्वाभाविकच, राजकीय मतं विसरून लोकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. माध्यमांच्या समोर सतत येणाऱ्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना पाहिले असता अशी शंका येत होती की आता पवार कुटुंबातीलच कोणीतरी म्हणजे मुख्यत्वे सुप्रिया सुळे याच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची धुरा सांभाळतील. सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी पक्षातल्या काही नेत्यांनी अशी विधानं देखील केली की, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी अजितदादांची इच्छा होती. या सर्व घटनांना आता एक दोन दिवस उलटून गेलेत आणि आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी बातमी आली.  दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या विषयाच्या संदर्भात एक प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे तोलून मापून बोलणारे आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं नेहमीच लक्षवेधक असतं. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहू. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आपल्या बोलण्यात केला. माझी रा...

कधी बहर कधी शिशिर

 डिसेंबर २०२४ मधली घटना आहे. महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरातल्या राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला होता. पण, या नव्या मंत्रिमंडळात गेल्या वीस वर्षांपासून हमखास असलेले एक नाव मात्र नव्हते.  दुसऱ्या दिवशी या मंत्रिमंडळात वगळल्या गेलेल्या नेत्याने पत्रकारांशी बोलताना तीव्र नाराजी, दुःख आणि आपली खदखद व्यक्त केली. "जहाँ नहीं चैना, वहाॅं नहीं रहना" असं हा नेता बोलला.  आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल हा नेता कोण. कालांतराने म्हणजेच ५-६ महिन्यानंतर भुजबळ पुन्हा एकदा मंत्री झाले. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या घटना आहेत.  अजितदादांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांना तातडीने जे शिष्टमंडळ भेटलं त्यात भुजबळ देखील होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या अजित पवारांच्या मर्जीतल्या शिलेदारांसोबत भुजबळ देखील दिसले. विधिमंडळ गटनेत्याची निवड कधी होईल वगैरे पत्रकारांना माहिती देखील भुजबळांनी दिली.  वर्षभरापूर्वी पक्ष सोडण्याची भाषा करणारे भुजबळ अजितदादांच्या मृत्यूनंतर आघाडीच्या नेत्यांपैकी एक दिसत होते. सत्त...

रमेश प्रभू, खिशातले राजीनामे आणि महिला आरक्षण विधेयक

१६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये महिला आरक्षण विधेयकाची चर्चा झाली. विधेयक पारित व्हायला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती, जे अर्थातच सरकारकडे नसल्यामुळे विधेयक पारित झाले नाही. या सर्व घटनांचा, पूर्वी घडलेल्या घटनांच्या आधारे धांडोळा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंगालच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम मोदींनी हे विधेयक संसदेत आणले आणि हाणून पडू दिले जेणेकरून बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना उचलता येईल असा कयास राजकीय पंडितांकडून वर्तवला जात आहे. एक प्रकारे महिला आरक्षण विधेयकावर मते मिळतात की नाही हे बंगालच्या निवडणुकांमधून भारतीय जनता पक्षाला चाचपून बघायचे आहे असे विश्लेषकांचे मत आहे.  हे घटनाचक्र बघितले असता १९८७ मध्ये झालेल्या विलेपार्ले येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आठवण येते. या निवडणुकीत सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी "गर्व से कहो हम हिंदू है" अशी घोषणा दिली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मिळतात की नाही हे बाळासाहेबांना चाचपून बघायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी विलेपार्ले येथील पोटनिवडणुकीवर त्याचा प्रय...