"एक होता कार्व्हर" हे शीर्षकच इतके बोलके आहे की त्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की लेखिकेला कथा सांगण्यात रुची आहे.
देशकाल स्थल परिस्थिती भिन्न असलेल्या एखाद्या महापुरुषाचं चरित्र लिहिणे हे एक कठीण काम असते. त्यातही जर ते चरित्र कुठल्याही वयातल्या व्यक्तीनी वाचावं आणि त्यातून बोध घ्यावा अशा पद्धतीनी लिहायचं असेल तर मग हे काम अजूनच कठीण होते. "एक होता कार्व्हर" च्या बाबतीत हे अतिशय कठीण काम लेखिका वीणा गवाणकर यांनी अतिशय यशस्वीपणे केलेले आहे.
"एक होता कार्व्हर" हे थोर अमेरिकन कृषीतज्ज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे कादंबरीवजा लघुचरित्र आहे. कथा सहजपणे फुलवत फुलवत लेखिका जाते आणि आपण एका सुंदर कलाकृतीच्या आस्वादाबरोबरच एका अज्ञात पण अतिशय अभ्यासू आणि सृजनशील व्यक्तीच्या आयुष्याची सुंदर सफर करत आहोत असे वाचकाला वाटत राहते. त्यामुळे पुस्तक पूर्ण केल्याशिवाय हातातून सोडवत नाही . १९ व्या शतकातील अमेरीका, तिथली गुलामगिरीची प्रथा आणि निग्रोंना होणारे त्रास, त्यांच्या भयानक समस्या यांची देखील वाचकाला कल्पना येते.
लेखिका आत्या, बाई, बाबा या भारतीय नात्यांची उपमा चरित्रनायकाच्या आयुष्यातल्या व्यक्तींसाठी वापरते. त्यामुळे लेखन शैली बाळबोध होऊन त्याची परिणती पुस्तकाच्या लोकप्रियतेत झाली आहे. आजमितीपर्यंत या पुस्तकाच्या ४५ आवृत्त्या निघाव्या यावरून या पुस्तकाची लोकप्रियता आणि लेखनशैलीची उत्कृष्टता अधोरेखित होते.
ज्यांना मराठी वाचनाची सवय लावायची आहे त्यांना भेट देण्यासाठी अतिशय योग्य असे हे पुस्तक आहे.
सर्व लहानांनी आणि लहानपण जपावंसं वाटणाऱ्या सर्व मोठ्यांनी, रचनात्मक दृष्टी बाळगणाऱ्या सर्वांनी, निर्मितीचा आनंद ज्यांना मिळतो अशांनी, क्षमा - निस्वार्थी भाव शिकण्याची इच्छा असलेल्या आणि त्यातून प्रेरणा घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक.
लेखिका: वीणा गवाणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या: १८२

मस्त विश्लेषण
ReplyDeleteखूप छान पुस्तक अभिप्राय.
ReplyDeleteEk uttam pustak, an ek apratim Parichay 🙌🏼
ReplyDeleteछान परिक्षण लिहिलं आहेस.. ग्रेट..शुभेच्छा
ReplyDeleteदेवाषिस, खूपच त्रोटक लिहितो आहेस. पुस्तकाबद्दल जिज्ञासा वाढावी यासाठी त्यातील काही कोटेशन्स टाकली तर पूरक ठरतं. जसे, कार्व्हरच्या जीवनाला कलाटणी देणारे दोन-तीन प्रसंग या पुस्तकात आहेत. त्यातला एखादा प्रसंग उद्घृत केला असता तर अधिक मजा आली असती. असो, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हे ही नसे थोडके. 👍
ReplyDeletenakki
Delete